आमच्या बद्दल

MHT-CET व NEET ची तयारी करा मजेत, तुमच्या भाषेत !

आता MHT-CET व NEET चा अभ्यास करणं आहे खूपच सोप. अभ्यास करा कुठल्याही जागी कुठल्याही वेळी.

सोडा इंग्लिश ची भीती संकल्पनांशी करा मैत्री.

इंग्रजीतील संकल्पना समजत नाहीत ?

मराठी माध्यमातून दहावी पर्यंत शिक्षण झालेले विद्यार्थी जेव्हा ११वी साठी विज्ञान शाखा निवडतात त्यावेळी पाठ्यक्रम इंग्रजी भाषेत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करतात. अचानक अभ्यासाचे माध्यम बदलल्यामुळे विध्यार्थी अभ्यास करताना गोंधळून जातात. विद्यार्थी हुशार असूनही इंग्लिशमधील कठीण शब्द, व्याकरण यांची सवय नसल्यामुळे सोप्या संकल्पना ही समजून घेऊ शकत नाहीत, आणि त्यामुळे प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविण्यात कमी पडतात.

GurukulScience.com च्या या कोर्सेस मध्ये ११वी आणि १२ वी च्या पाठ्यपुस्तकामधील प्रत्येक संकल्पना सोप्या करून, मराठी भाषेत समजावून सांगितल्या आहेत. संकल्पना समजल्या कि शिकण्यासही हुरूप येतो आणि कायम लक्षात राहतात. या कोर्सेस चा उपयोग तुम्ही तुमच्या नेहेमीच्या कॉलेज, क्लास सोबत पूरक म्हणून करू शकता किंवा पूर्णपणे स्वयंअध्ययनासाठी मार्गदर्शक म्हणूनही करू शकता.

तुमचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून संपूर्ण पाठ्यपुस्तकातील इंग्रजीतील संकल्पना शब्दशः मराठीत मजकुराच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आलेल्या आहेत. मजकूर वाचल्यानंतर तुम्ही व्हिडीओ लेक्चर बघून संकल्पना अधिक उत्तम रीतीने समजून घेऊ शकता. आपल्याला किती समजलं हे जाणण्यासाठी लगेच त्या भागावर आधारित वस्तुनिष्ठ (Objective Type MCQ’s) प्रश्नांचा  सराव करू शकता ज्याचा निकाल तुम्हाला लगेच मिळतो.

Text Explanations

पाठ्यपुस्तकातील इंग्लिश मजकुराचे शब्दशः मराठीत स्पष्टीकरण

Video Explainers

सर्व संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे व्हिडीओ एक्स्प्लेनर्स

Objective MCQ's

प्रत्येक भागावर आधारित MCQ Tests

error:
Skip to content