Self study साठी तसेच कोचिंग क्लास सोबत पूरक कोर्स

कोचिंग क्लास असला किंवा नसला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला सेल्फ स्टडी करावाच लागतो. स्वतः अभ्यास केल्याशिवाय संकल्पना पक्क्या लक्षात राहत नाहीत व थोड्याच दिवसांत विसरून जातात. त्यामुळेच नियमितपणे स्वतः अभ्यास/सराव करणे याला MHT-CET/NEET प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खूप महत्व आहे. सेल्फ स्टडी करताना पाठातील भाग व्यवस्थित समजलेला असेल तर अभ्यासाचा वेग वाढतो. कॉलेज मधे किंवा कोचिंग क्लासमधे व्यवस्थित शिकवले जात असेल तर सेल्फ स्टडी साठी ते फायद्याचे ठरते मात्र या सुविधा उपलब्ध नसलेल्या व पूर्णपणे सेल्फ स्टडी वर विसंबून असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागते. त्यासोबतच अकरावी-बारावीच्या वर्षात माध्यम इंग्रजी असल्यामुळे काहीच समजत नाहिये व हे आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे असे समजून हुषार विद्यार्थी देखील हतबल होऊ शकतात.

विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन GurukulScience.Com ने MHT-CET/NEET चा अभ्यासक्रम मराठीतून सहज समजेल अशापद्धतीने कोर्सच्या रूपात मांडला आहे. या कोर्सच्या सहाय्याने फक्त वाचूनही विद्यार्थी विषय सहज समजून घेऊ शकतात. त्याजोडीलाच सोप्या भाषेत कुठलाही फापटपसारा न वाढवता ‘To The Point’ ॲनिमेशनसह सहज विषय समजून सांगणारे व्हिडिओ एक्स्प्लेनर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक टॉपिकवर आधारीत MCQ टेस्ट सोडवता येतात.

MHT-CET/NEET प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे त्यासोबत तज्ञ मार्गदर्शन मिळाल्यास स्वयंअध्ययनातही अभ्यासाचा वेग वाढवता येतो. कोचिंग क्लास/कॉलेज मधील मार्गदर्शनाला वेळेच्या मर्यादा असतात मात्र GurukulScience.Com चा कोर्स तुम्ही 24 तास केव्हाही वापरू शकता, तुम्हाला न समजणारा भाग पुन्हा पुन्हा बघू शकता.

विद्यार्थ्याने अंगी सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त बाणावलेली असेल तर एकाग्रता व चिकाटीच्या सहाय्याने फक्त या कोर्सच्या माध्यमाने देखील वेगाने अभ्यास पूर्ण करता येईल.

आपला वैयक्तिक मार्गदर्शक म्हणून GurukulScience.Com च्या या कोर्सचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता व संपूर्ण तयारीसह आत्मविश्वासाने प्रवेशपरीक्षेला सामोरे जाऊ शकता.

error:
Skip to content