Frequently Asked Questions

या कोर्स चा वापर करून MHT-CET व NEET ची परीक्षा मराठी माध्यमातून देता येइल का?

उत्तर: नाही. हा कोर्स MHT-CET व NEET ची परीक्षा मराठी माध्यमातून देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवला गेलेला नाही. हा कोर्स जे विद्यार्थी या परीक्षा इंग्रजी माध्यमातून देऊ इच्छितात मात्र अभ्यासक्रम मराठीतून समजावून घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला गेलेला आहे. या कोर्स मधे इंग्रजी संज्ञांचाच वापर केलेला आहे मात्र त्यांचा अर्थ मराठीतून समजावून सांगितला आहे. मुळात संपूर्ण मराठी माध्यमातून (मराठी संज्ञांसह) अकरावी बारावी विज्ञान विषयाचा अभ्यास करणे पुढील करिअरच्या दृष्टिने उपयोगाचे नाही, कारण पुढील बहुतेक उच्च शिक्षण हे इंग्रजी माध्यमातच उपलब्ध आहे. वैद्यकिय, फार्मसी, ॲग्रीकल्चर, नर्सिंग, फिजिओथेरेपी इ. सर्व विषय हे इंग्रजी माध्यमातूनच उपलब्ध आहेत.

या कोर्स चा हेतू काय?

उत्तर: इयत्ता दहावी पर्यंत शिक्षणाचे माध्यम मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अकरावी सायंस शाखेला प्रवेश घेतल्यानंतर अचानक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाल्यामुळे अभ्यासक्रम/पाठ्यपुस्तकातील संकल्पना समजण्यात अडचणी येतात. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी अभ्यासात तसेच परीक्षेमधे चांगले गुण मिळवण्यात मागे पडतात व स्पर्धेतही मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या कोर्सची रचना केलेली आहे. मराठीच्या मदतीने इंग्रजीतील अभ्यास पक्का समजणे व लक्षात राहणे हे या कोर्सच्या माध्यमातून साध्य करता येईल.

या कोर्सचा फायदा NEET साठी होईल का?

उत्तर: gurukulscience.com चे सध्याचे कोर्सेस हे महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत त्यामुळे ते मुख्यतः MHT-CET व बोर्ड परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र इयत्ता अकरावी-बारावी चा महाराष्ट्र बोर्डाचा नवीन अभ्यासक्रम हा केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमासारखाच बनवला गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमात बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. यामुळे gurukulscience.com च्या या कोर्सेस चा उपयोग NEET चा अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी सुद्धा होईल. तसेच यापुढील काळत विशेष NEET साठी स्वतंत्र कोर्सेस सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील.

या कोर्सची फी मासिक आहे की एकरकमी?

उत्तर: प्रत्येक कोर्सच्या सेल पेज वर असलेली फी ही पूर्णपणे एकरकमी आहे. एकदा ही फी भरल्यानंतर एक पूर्ण वर्ष त्या संपूर्ण कोर्सचा वापर करता येईल.

हा कोर्स कुणासाठी आहे?

उत्तर: हा कोर्स पुढील प्रकारच्या स्थितीमधे विशेष उपयुक्त असेल.

  1. इंग्रजीची अडचण असणारे विद्यार्थी, जे इंग्रजीतील संकल्पना चांगल्याप्रकारे समजून घेऊ इच्छितात
  2. विषय मुळातून समजून घेण्याची इच्छा असणारे विद्यार्थी
  3. असे विद्यार्थी ज्यांना कोचिंग क्लास उपलब्ध नाही, व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे
  4. सेल्फ स्ट्डी (स्वयंअध्यन) साठी मार्गदर्शन हवे असणारे विद्यार्थी
इतर क्लास सोबत हा कोर्स करता येईल का?

उत्तर: तुम्ही इतर क्लास लावला असेल तर त्यासोबतच हा कोर्स सुद्धा करणे फायद्याचेचे राहील. क्लासमधे एकदा शिकवलेला भाग त्या दिवसानंतर पुन्हा शिकवला जात नाही. या कोर्समधे पाठ्यपुस्तकातील कुठल्याही भागावरचे स्पष्टीकरण तुम्ही जेव्हा हवे तेव्हा बघू शकता. सहाजिकच क्लासमधे न समजलेला भाग समजून घेण्यासाठी या कोर्स चा फायदाच होईल. आणि रेग्युलर क्लासच्या तुलनेत या कोर्सची फी अतिशय कमी आहे.

रिपीटर विद्यार्थ्यांना या कोर्सचा उपयोग होईल का?

उत्तर: रिपिटर विद्यार्थ्यांना न समजलेल्या संकल्पना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी व त्याद्वारे पुढच्या परीक्षेत त्यांच्या गुणांमधे सुधार करण्यासाठी या कोर्सचा अवश्य उपयोग होईल.

शालेय विद्यार्थ्यांना MHT-CET व NEET चा अभ्यास करण्यासाठी या कोर्सचा उपयोग होईल का?

उत्तर: 7वी, 8वी, 9वी पासून MHT-CET व NEET चा अभ्यास करणे हे आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक बनले आहे. देशाच्या इतर भागात विद्यार्थी शाळेत असल्यापासूनच या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास करत असतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी याप्रकारे शाळेत असल्यापासूनच या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास सुरु केल्यास नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षामधे यश मिळेल. त्यासाठी सहज सोप्या भाषेत व मराठीतून विषय समजून घेण्यासाठी या कोर्सचा चांगला उपयोग करून घेता येईल.

इतर विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स उपलब्ध आहेत का?

उत्तर: सध्याच्या स्थितीत फक्त बायोलॉजी हाच विषय उपलब्ध आहे. येत्या काळात इतर विषय उपलब्ध करून देण्यात येतील मात्र या वर्षाअखेर पर्यंत तरी उपलब्ध होणार नाहीत. योग्य दर्जा राखूनच विषय उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे त्यासाठी वेळ लागेल. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या बायोलॉजी विषयाचा अभ्यासासाठी उपयोग करून घ्यावा.

तुम्हाला याव्यतिरिक्त काही प्रश्न असल्यास कॉंटॅक्ट पेज चा वापर करून प्रश्न पाठवा.

error:
Skip to content