7 वी, 8 वी, 9 वी पासून MHT-CET व NEET ची तयारी

आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. इच्छुकांची संख्या जास्त मात्र ‘चांगल्या’ संधींची उपलब्धता कमी यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षणक्षेत्रात चांगल्या संधी म्हणजे कोणत्या तर दर्जेदार, नावाजलेल्या राष्ट्रीय स्तरवरील संस्थांमधे जसे की AIIMS, AFMC, Government Medical colleges, IIT, NIT इ. मधे अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे व तेथील दर्जेदार शिक्षणक्रम पूर्ण करून चांगल्या करिअर ला सुरुवात करणे. या संस्थांमधे प्रवेश मिळवला तर पुढे करिअरचे मार्ग आपोआप सोपे होतात. मात्र या संस्थांमधे अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे सोपे राहिलेले नाही. तसे ते कधीच सोपे नव्हते मात्र आजकाल स्पर्धेची तीव्रता खूप वाढली आहे. या संस्थांमधील कट ऑफ ची टक्केवारी वर्षानुवर्षे वाढत आहे. अगदी नव्वद टक्क्यांवरचे गुणही अपुरे पडावे अशी स्थिती आहे. या वाढत्या टक्केवारीसोबत गुणवत्ताही वाढते का हा वादाचा विषय आहे. या संस्थांमधे प्रवेश मिळवू शकणारे विद्यार्थी अंगभूत गुणवत्तेमुळे तिथे पोहोचतात की ठरावीक दिशेने योग्य मार्गदर्शनासहीत कठोर परीश्रम करून तिथे पोहोचतात हाही अभ्यासाचा विषय आहे. या संस्थांमधे प्रवेश मिळाला नाही की मग दुय्यम व तृतीय श्रेणीच्या महाविद्यालयांमधे प्रवेश घ्यावा लागतो. याप्रकारच्या महाविद्यालयांच्या दर्जात खूप ‘’विविधता’ असते. चांगले कॉलेज मिळाले नाही तर पुढे शिक्षणाची व करिअरची आबाळ ठरलेलीच. अशाप्रकारच्या महाविद्यालयांतील अनेक जागा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रिकाम्या राहतात.

चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशपरीक्षेमधे चांगले मार्क मिळवणे आवश्यक आहे. बहुतेक विद्यार्थी या प्रवेश परीक्षांचा अभ्यास बारावीला प्रवेश घेतल्यावर सुरु करतात. फार थोडे विद्यार्थी अकरावीपासूनच या प्रवेशपरीक्षांचा गांभीर्याने अभ्यास सुरु करतात. यातील बर्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत अभ्यासक्रम जड असल्यामुळे ही दोन वर्षे अभ्यासक्रम समजण्यातच चाचपडत निघून जातात.

अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे त्याचवेळी इंग्रजी माध्यम असल्यामुळे अभ्यासक्रम समजणे व तो वेळेत पूर्ण करणे हे एक आव्हान बनते. मराठी माध्यमाचे विद्यार्थी तर या माध्यमबदलामुळे गोधळून जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रम समजून घेण्यासाठीच दोन वर्षेही पुरे पडत नाहीत त्यामुळे प्रवेशपरीक्षांची तयारी पूर्ण होत नाही व त्यामुळे शेवटी परीक्षेत कमी मार्क मिळतात.

MHT-CET च्या अभ्यासक्रमात PCB व PCMB ग्रुप मधे पुढील विषयांचा समावेश होतो

PCMB Group

11th Biology

12th Biology

11th Chemistry

12th Chemistry

11th Physics

12th Physics

11th Mathematics

12th Mathematics

PCB Group

11th Biology

12th Biology

11th Chemistry

12th Chemistry

11th Physics

12th Physics

या प्रचंड स्पर्धेमुळेच आपले ध्येय स्पष्ट असणारे विद्यार्थी शाळेत असल्यापासूनच या प्रवेशपरीक्षांची तयारी सुरु करतात. उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळेच या प्रवेशपरीक्षांची निवडयादी बघितली तर देशाच्या या भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आढळते. महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांमधे या बाबत जागरुकता कमी आहे व त्यासोबतच मार्गदर्शनाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळेच बहुतेक विद्यार्थी या प्रवेशपरीक्षांचा विचार अकरावी बारावीला आल्यावरच करतात व प्रचंड अभ्यासक्रम वेळेत पूर्ण न करू शकल्यामुळे त्यातील बहुतांश विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यास अपयशी ठरतात.

MHT-CET ची तयारी करण्यासाठी GurukulScience.Com ने आखलेले मराठीतून मार्गदर्शन करणारे कोर्स हे शाळेपासूनच या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास सुरु करण्यासाठी उपयोगाचे आहेत. शाळेच्या अभ्यासासोबतच रोज फकत एक तास किंवा अठवड्यातून पाच तास या कोर्सच्या माध्यमाने अभ्यास केल्यास एका शैक्षणिक वर्षात MHT-CET/NEET चा एक विषय पूर्ण करता येईल. इयत्ता सातवीपासूनच सुरुवात केल्यास अकरावीला प्रवेश घेण्यापुर्वीच 50% अभ्यासक्रमाचा चांगल्या प्रकारे परीचय झालेला असेल व त्यामुळे अकरावी बारावीच्या दोन वर्षात राहिलेला 50% अभ्यासक्रम आत्मसात करण्यासाठीच मेहनत करावी लागेल. यामुळे तुम्ही जास्त वेळ प्रवेशपरीक्षेच्या सरावाला देऊ शकता. याचा चांगला परिणाम या प्रवेशपरीक्षांमधे चांगले गुण मिळवण्यासाठी होईल.

7 वी पासून सुरुवात केल्यास

MHT-CET/NEET ची तयारी

7 वी ला असताना

8 वी ला असताना

9 वी ला असताना

10 वी ला असताना

(Optional)

अभ्यासाचा विषय

11th Biology

12th Biology

11th Chemistry

12th Chemistry


MHT-CET च्या अभ्यासक्रमाचा 50% भाग

अशाप्रकारे 7 वी पासून सुरुवात करून तुम्ही 50% अभ्यास अकरावीला जाण्यापुर्वीच पूर्ण करू शकता. इयत्ता 8 वी, 9 वी, 10 वी त असणारे विद्यार्थीही पुढीलप्रमाणे तयारी करू शकतात.

8 वी पासून सुरुवात केल्यास

MHT-CET/NEET ची तयारी

8 वी ला असताना

9 वी ला असताना

10 वी ला असताना

(Optional)

8 वी पासून सुरुवात

11th Biology

12th Biology

11th Chemistry


MHT-CET च्या अभ्यासक्रमाचा 37.5% भाग

9 वी पासून सुरुवात केल्यास

MHT-CET/NEET ची तयारी

9 वी ला असताना

10 वी ला असताना

(Optional)

9 वी पासून सुरुवात

11th Biology

12th Biology


MHT-CET च्या अभ्यासक्रमाचा 25% भाग

10 वी पासून सुरुवात केल्यास (हे ऑप्शनल असू द्या, दहावीला तुम्ही फक्त दहावीच्या अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रीत करू शकता)

MHT-CET/NEET ची तयारी

10 वी ला असताना

(Optional)

10 वी पासून सुरुवात

11th Biology

दहावीला असताना विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावे. ज्यांची क्षमता आहे त्यांनीच दहावीच्या वर्षात MHT-CET/NEET चा अभ्यास करावा.

अशाप्रकारे शाळेपासूनच MHT-CET/NEET सारख्या परीक्षांची तयारी केल्यास बराच अभ्यासक्रम परिचयाचा होतो त्यामुळे अकरावी-बारावी मधे गेल्यानंतर या विषयांवर जास्त मेहनत घ्यावी लागत नाही व इतर विषयांना जास्त वेळ देता येतो. तसेच तुलनेने जास्त वेळ उपलब्ध झाल्यामुळे अभ्यासाचे दडपण येत नाही व उपलब्ध वेळेचा चांगला उपयोग करून घेता येतो. शालेपासूनच या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत ॲडव्हांटेज मिळतो व चांगली रॅंक व चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता वाढते.

शालेय विद्यार्थी GurukulScience.Com च्या कोर्सेस चा उपयोग MHT-CET/NEET च्या तयारीसाठी करू शकतात.

error:
Skip to content