1.1 Basic principles of life

Chapter 01
Living World
सजीव जगत

पृथ्वी ग्रह हा अ‍बायोटिक (Abiotic = निर्जीव) आणि बायोटिक (Biotic = सजीव) घटकांनी बनलेला आहे. यातील बायोटिक घटक म्हणजे साहजिकच आपल्या सभोवतालचे लिव्हिंग बिइंगस (livng beings = सजीव) आहेत. प्रश्न असा आहे की आपण त्यांना सजीव /जिवंत का म्हणतो? आणि लिव्हिंग (living =सजीव) हे नॉन-लिव्हिंग (non-living = निर्जीव) पेक्षा वेगळे कसे असतात?

1.1 बेसिक प्रिंसिपल्स ऑफ लाईफ (Basic principles of life = जीवनाची/ सजीवतेची मूलभूत तत्त्वे):

A. एकदा जन्माला आलेला जीव सर्व्हाइव्ह (survive =जगणे/ जिवंत राहणे) करण्यासाठी प्रयत्न करतो. सर्व्हाइव्हल (survival = जिवंत राहणे) साठी, त्याला एनर्जी (energy =ऊर्जा) आणि अनेक केमिकल मॉलिक्युल्स (chemical molecules =रासायनिक रेणू) आवश्यक असतात. एनर्जी (energy =ऊर्जा) साठी, त्याला मेटॅबॉलिझम (metabolism =चयापचय) करावे लागते. मेटॅबॉलिझम (metabolism =चयापचय) म्हणजे कॅटाबोलिझम (Catabolism) आणि अ‍ॅनाबोलिझम (Anabolism) यांचा समन्वय होय. कॅटाबोलिझम (Catabolism) म्हणजे रेणू (Molecule) तोडणे आणि अ‍ॅनाबोलिझम (Anabolism) म्हणजे नवीन रेणू (molecule) बनवणे.

(Metabolism = Catabolism + Anabolism).

B. बर्थ ऑनवर्ड्स (birth onwards = जन्मापासूनच), सजीव ग्रोथ (growth =वाढ) ची आणि डेव्हलपमेंट (development = वाढ/ विकास) ची टेंडन्सी (tendency =प्रवृत्ती) दर्शवतात. ही सजीवांची वाढ ही एक वेल ऑर्केस्ट्रेटेड (well orchestreted =सुचालीत / सुनियंत्रित /ठराविक योजनेनुसार चालणारी) प्रोसेस (process = प्रक्रिया) आहे. तुम्ही कदाचित सॅंड माऊंड्स (sand mounds =वाळूचे ढीग), बोल्डर्स (boulders = मोठाले दगड) इत्यादी यांच्यामध्ये ग्रोथ (growth = वाढ) होत असल्याचे निरीक्षण केले असेल. ही वाढ आतून (from inside) होत नाही आणि म्हणूनच वाळूचे ढीग, दगड इत्यादी हे सजीव नाहीत.

C. ग्रोथ (growth =वाढ) आणि डेव्हलपमेंट (development = वाढ/ विकास) ही अशी प्रक्रिया नाही जी अनलिमिटेड टाइम स्पॅन (unlimited time span = अमर्याद कालावधी) साठी चालेल. काही विशिष्ट वेळेनंतर माॅलिक्युल्स (molecules = रेणू), ऑर्गन्स (organs =अवयव), सिस्टिम्स (systems = प्रणाली) हे त्यांचे इफेक्टिव्ह वर्किंग (effective working = सक्षमता/ कार्य) गमावण्यास प्रारंभ करतात आणि ओल्ड (old = वृद्ध) होतात. ही शरीराची एजिंग प्रोसेस (Ageing Process = वृद्धत्व प्रक्रिया/ म्हातारे होत जाण्याची प्रक्रिया) आहे.

D. जीवन प्रक्रिया चालू ठेवावी लागते (life has to continue) म्हणून सजीव स्वतःसारखे नवीन सजीव / पिल्ले (young ones) जन्माला घालण्याचा प्रयत्न करतो. हे रिप्रोडक्शन (Reproduction = पुनरुत्पादन) मुळे (असेक्श्युअल (Asexual =अलैंगिक) किंवा सेक्श्युअल (Sexual = लैंगिक) पद्धतीने) शक्य असते. रिप्रोडक्शन (Reproduction = पुनरुत्पादन) हे कंटिन्यूटी ऑफ लाईफ (Continuity of life = जीववंशाचे सातत्य/ सजीवांचे अस्तित्व) एन्श्युअर (ensure =सुनिश्चित) करते. म्युल्स (Mules = खेचर), स्टराईल वर्कर बी (sterile worker bees = वांझोट्या कामगार मधमाश्या) हे प्राणी पुनरुत्पादन करू शकत नाहीत; तरीही ते सजीव आहेत. मग असे असेल तर आपण रिप्रोडक्शन (पुनरुत्पादन) ला इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ (inclusive characteristic of life = जीवनाचे समावेशक वैशिष्ट्य) म्हणजेच सजीवतेचे आवश्यक वैशिष्ट्य म्हणू शकतो का?

E. मेटॅबॉलिझम (metabolism =चयापचय) करण्याची क्षमता गमावल्यानंतर सजीव मरतात (the organism dies).

F. कोणताही सजीव थर्मल (thermal =उष्णता), केमिकल (chemical =रासायनिक) किंवा बायोलॉजिकल (biological = जैविक) चेंजेस (changes = बदल) ना रिस्पॉन्स (response = प्रतिसाद) देतो. ही सजीवांची युनिक प्रॉपर्टी (unique property = अद्वितीय गुणधर्म) आहे.

error:
Skip to content