मातृभाषेतून MHT-CET/NEET च्या तयारीचे फायदे

इंग्रजी ही आधुनिक जगाची ज्ञानभाषा आहे. आज कुठल्याही आधुनिक क्षेत्रात इंग्रजीशिवाय पर्याय नाही. बहुतेक विषयांतील आधुनिक शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या ज्ञानाला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्व आहे. विज्ञान विषयातील पुढील उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे त्यामुळेच अकरावी बारावीला विज्ञान विषय इंग्रजीतूनच उपलब्ध करून दिला जातो. हे योग्यच आहे. मात्र मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना हा दहावीनंतर होणारा हा माध्यमबदल गैरसोयीचा ठरतो व शिक्षणातील घोडदौडीत एक स्पीड ब्रेकर म्हणून समोर येतो. या बदलाला लवकर जुळवून घेणारे फार थोडे विद्यार्थी न अडखळता पुढे जाऊ शकतात मात्र बहुतेक अडखळतात व मागे पडतात.

दहावीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातून झालेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या माध्यमातून शिकण्याची सवय ही दहा वर्षांपासून झालेली असते. मराठी संज्ञा परिचयाच्या असतात. मराठीतून संकल्पनांवर विचार करणे सहज सोपे असते व नैसर्गिक वाटते. मात्र हेच गुणवंत विद्यार्थी अकरावी बारावी साठी विज्ञान शाखा निवडतात त्यावेळी अचानक शिक्षणाचे माध्यम बदलल्यामुळे गोंधळतात. इंग्रजी चा भाषाविषय म्हणूनच चांगला अभ्यास केलेला असतो मात्र हा अभ्यास संभाषणापुरता वाचनापुरता पुरेसा असला तरीही इंग्रजीतील विज्ञान विषयाच्या क्लिष्ट संकल्पना समजण्यासाठी पुरेसा नसतो. गुंतागुंतीच्या वाक्यरचना लवकर समजत नाहीत, संज्ञांचा अर्थ कळून येत नाही यामुळे विषय व्यवस्थित आत्मसात करता येत नाही व फक्त बेसिक अंडरस्टॅंडींग येण्यासाठी मोठ्याप्रमाणात वेळेचा अपव्यय होतो व अभ्यासही व्यवस्थित पूर्ण होत नाही.

मराठी माध्यमातून दहावीला उत्कृष्ट गुण मिळवणारे विद्यार्थी बारावीला आणि MHT-CET, NEET यासारख्या प्रवेशपरीक्षांमधे मात्र अडखळताना दिसतात. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मराठी ते इंग्रजी माध्यमबदल सुसह्य करण्यासाठी व इंग्रजी ज्ञानभाषेकडील प्रवास सहज करता यावा यासाठी GurukulScience.Com ने इंग्रजीतील विज्ञान विषय सोप्या मराठी भाषेत तुमच्यासाठी आणले आहेत. मातृभाषेतून शिकलेले लवकर समजते व कायमचे लक्षात राहते. अभास वेगाने करता येतो व विषयाची समज चांगल्याप्रकारे वाढते. GurukulScience.Com च्या कोर्स चा वापर करून तुम्ही अकरावी बारावी विज्ञान विषयांचा अभ्यास सहज सोप्या मराठी भाषेत करू शकता. यात इंग्रजी संज्ञांचा अर्थ सोपा करून सांगितला आहे. क्लिष्ट संकल्पनाही सहज समजतील अशाप्रकारे समजावून सांगितल्या आहेत. अवघड इंग्रजी शब्दांचे अर्थ व स्पष्टीकरण जिथल्या तिथे मिळतात त्यामुळे शब्दांचा अर्थ शोधण्यात वाक्यांचा अर्थ लावण्यात वेळ वाया जात नाही. संकल्पनाही सहज ओघवत्या भाषेत सांगितलेल्या असल्यामुळे सहज समजतात व कायमच्या लक्षात राहतात. यासोबतच प्रत्येक टॉपिक वर आधारीत MCQ Test सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावरील MCQ सोडवण्याची प्रॅक्टीस अभ्यासासोबतच होते.

चला तर मग लगेच GurukulScience.Com च्या कोर्सेस ला जॉइन व्हा आणि इंग्रजीतील अवघड अभ्यास मराठीतून सहज करा

error:
Skip to content